*नांदेड, दि. 09 नोव्हेंबर २०२४* :- तिरुमला तिरुपती देवस्थानमस् (TTD) आंध्रप्रदेश येथे 11 ते 14 नोव्हेंबर करिता परकानिमी सेवा (हुंडी मधील रक्कम मोजदाद) शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांची निवड झालेली आहे. परकानिमी सेवेसाठी तीन महिने अगोदर तिरुमला तिरुपती देवस्थानमस् (TTD) यांचे srivariseva.tirmala.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केलेली होती, त्यामुळे त्यांची निवड झाली असून त्यांना एसएमएसव्दारे कळविले आहे. परकानिमी सेवा करीता महावितरण कार्यालय, नांदेड अंतर्गत प्रमुख लिपीक गजेंद्र् राजूरकर, उप-व्यवस्थापक (विवले) वैभव गायकवाड, निम्नस्तर लिपीक सुनिल कोटलवार, यंत्रचालक सुनिल टिप्परसे, टंकलेखक बालाजी टिंगरे व पोलिस विभागातील पोलीस नाईक गणेश इंदूरकर, पोष्ट् विभागातील सेवानिवृत्त् पोष्ट् मास्टर बालाजी सेवनकर, पशुवैद्यकिय अधिकारी चंद्र्कांत सेवनकर, पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त् दुरभाष चालक किशोर कळसकर, बँकेतील कर्मचारी गोविंद कळसकर, रमेश टिंगरे, बस कंडक्टर एसटी महामंडळ मधील वाहक दत्ता दामेकर व इतर व्यावसायीक अशोक टिंगरे, प्रफुल्ल् शिंगडे, राजेश जाधव हे सर्वजण देवगिरी एक्सप्रेसने पुढील प्रवासासाठी आज रवाना झालेत. त्यांना आज सकाळी रेल्वे स्टेशनवर शुभेच्छा देण्यासाठी सौ. शीलाताई सुनील पल्लेवाड, सौ.सविता ऊप्पलवाड, सौ.मनिषा साईप्रसाद कळसकर, बालाजी चिद्रावार, चंद्रशेखर गडप्पा व इंदूरकर गुरुजी आदी उपस्थित होते.
*परकामिनी सेवेकरिता तिरुमला तिरुपती देवस्थानमस् येथे 14 कर्मचारी रवाना*
addComments
टिप्पणी पोस्ट करा