प्रचारासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे उद्या दिनांक 13 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे

 


नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे उद्या दिनांक 13 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे व्यापारी वर्गाशी संवाद साधणार आहेत. 

हॉटेल विसावा पॅलेस येथे  सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी वर्ग संवाद बैठकीसाठी लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्यासह भारतीय जनता पार्टी , महायुतीतील अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत समस्त व्यापारी,सीए,डॉक्टर्स,बिल्डर्स,उद्योजक यांच्यासह भाजपा व्यापारी आघाडी महानगर नांदेडच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांशी केंद्रीय मंत्री पियूष गोयल संवाद साधणार आहेत.आयोजित व्यापारी वर्ग संवाद बैठकीला व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व व्यापारी बांधवांनी उपस्थित आवर्जुन राहावे असे आवाहन भाजपा व्यापारी आघाडी महानगर अध्यक्ष प्रेमकुमार फेरवानी यांनी केले आहे.

टिप्पण्या