माहुर (प्रतिनीधी) आदिवासी बंजारा बहुल असलेल्या किनवट /माहुर मतदारसंघात माजी आमदार प्रदीप नाईक यांनी १५ वर्षात व विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी मागील ५ वर्षात केलेल्या विकास कामांचीच सर्वत्र चर्चा व तुलना होत आहे. ही राजकीय दृष्ट्या आ. केराम यांना सक्षम करणारी, तर दुसरी कडे प्रदीप नाईक गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण करणारी तसेच आत्मविश्वासाला तडा देणारी बाब असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट/ माहुरच्या जनतेला मिनी बरामती करण्याचे स्वप्न दाखविले होते.मिनी बारामती तर सोडाच दहा वर्षे सत्तेत राहून सुद्धा त्यांना माहुर ते किनवट या रस्त्याची दुरावस्था दूर करता आली नाही, हे वास्तव मतदारसंघातील मतदार विसरले नाहीत. त्याच रस्त्याचे आ. भिमराव केराम यांच्या सरकारने महामार्गात रूपांतर करून भव्य रोड बांधून दिला.यालाच हातच्या काकणाला आरसा कशाला ही उक्ती तंतोतंत लागू पडते.त्यामुळेच "कहो दिल से केराम साहब फिर से हे वाक्य या मतदासंघाचे ब्रीदवाक्य बनले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा