गुरुद्वारा श्री नानकसार साहिब विष्णुपुरी येथे आज २९ ऑक्टोबर रोजी सालाना बरसी



नांदेड - येथील गुरुद्वारा श्री नानकसार साहिब विष्णुपुरी येथे  आज २९ ऑक्टोबर रोजी संतां च्या सालाना बरसीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सचखंडवासी संत बाबा दलीपसिंघ जी ,सचखंडवासी संत बाबा जीवनसिंघ जी,सचखंडवासी संत बाबा हरिसिंघ जी आणि सचखंडवासी संत बाबा शीशासिंघ जी कारसेवा वाले यांची सालाना बरसी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाणार आहे. श्री अखंड पाठ रविवार, २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू करण्यात आला होता. आज मंगळवार, २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाठाची समाप्ती होणार आहे. या शुभप्रसंगी संत, थोर सद्गुणी व रागी सज्जन कीर्तन व प्रवचन होणार आहे. कुटुंबासह गुरु महाराजांचे दर्शन घेऊन आनंद घ्यावा असे आवाहन गुरु पंथाचे दास लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरिंदरसिंघ कारसेवावाले व संत बाबा बलविंदरसिंघ कारसेवावाले यांनी केले आहे. कार्यक्रमा नंतर गुरूंचे लंगर अखंड राहील अशी माहिती गुरुद्वारा श्री नानकसार साहिब विष्णुपुरी चे जत्थेदार बाबा सुखविंदरसिंघ यांनी दिली आहे.

टिप्पण्या