रासेयो 'यशवंत ' तर्फे मतदार जागृती अभियान*


दिनांक: २१-१०-२४

           राष्ट्रीय सेवा योजना, यशवंत महाविद्यालयातर्फे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मतदार जागृती अभियानअंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

          प्रा.कबीर रबडे, उपप्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालय यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली.

मतदारांना जागृत करण्यासाठी, जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना यशवंत महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी रॅलीचे आयोजन केले होते.

          सदर रॅलीचा मार्ग हा यशवंत महाविद्यालय ते आनंदनगर, आनंद नगर ते भाग्यनगर आणि परत यशवंत महाविद्यालय असा होता.

          विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात मतदानविषयक घोषवाक्य देत मतदारांना जागृत होण्याचे तसेच जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.

           सदर रॅलीच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना, यशवंत महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के प्रा. अभिनंदन इंगोले,  प्रा. श्रीराम हुलसुरे तसेच बहुसंख्य स्वयंसेवकांनी  परिश्रम घेतले. 

          मतदान जागृती रॅलीकरिता उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या