नांदेड:(दि.१४ ऑक्टोबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात नांदेड जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन महोत्सव यशस्वीरित्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात नाविन्यपूर्ण भावना आणि संशोधन कौशल्याचे उत्कृष्ट सादरीकरण केल्या गेले.
महोत्सव उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी व उद्घाटक संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर होते. याप्रसंगी मंचावर विद्यापीठ समन्वयक डॉ. काशिनाथ भोगले, सहसमन्वयक डॉ. हेमलता भोसले आणि डॉ.राजेश्वर क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी सोहळ्याचे उद्घाटन केले.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, नवकल्पना आणि संशोधनावर आधारित अर्थव्यवस्था हे शैक्षणिक संशोधनाचे व्यावहारिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करते. संशोधन आणि विकासाच्या भूमिकेवर व्यापक दृष्टिकोन स्वीकारावयास हवा. आंतरविद्याशाखीय संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
समारोप आणि बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे होते. यावेळी डॉ. संतोष देवसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.संतोष देवसरकर यांनी, बक्षीस जिंकलेल्या विद्यार्थ्यांच्या यशावर आणि सहभागी स्पर्धकांच्या परिश्रमावर विचार व्यक्त केले.
डॉ.वनदेव बोरकर आणि डॉ. संजय ननवरे यांनी प्रत्येक गटातील विजेत्यांची नावे जाहीर केली. शेवटी आभार प्रा. भारती सुवर्णकार यांनी मानले.
महोत्सवाच्या यशासाठी महाविद्यालय समन्वयक डॉ.एम.एम. व्ही. बेग, डॉ.संजय ननवरे, डॉ. वनदेव बोरकर, प्रा.भारती सुवर्णकार, डॉ.नीरज पांडे, डॉ. धनराज भुरे, डॉ.दिगंबर भोसले, डॉ.साईनाथ शाहू, डॉ. पी. आर.चिकटे, डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ. वाय.के.नकाते, डॉ.मदन अंभोरे, डॉ. राजरत्न सोनटक्के, एस. एम. मदेवाड, व्ही.जी.अडबलवार, व्हि..पी. इंगोले, गोविंद शिंदे, अफसर अन्सारी, एस. बी. मिरेवाड, बी.एम.शिंदे, डी.के. वाघमारे यांनी परिश्रम घेतले व उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा