*राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत आद्या बाहेती ला रौप्य पदक*


परभणी(.               ) दि१८ते २५ ऑक्टोबर दरम्यान गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत  परभणी च्या आद्या बाहेती रौप्य पदक पटकावले .

        ११ वर्षे मुलींच्या गटात पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या साखळी गटातील पहिल्या सामन्यात कर्नाटकच्या संतोष सक्ष्या या खेळाडूवर ३-१ आसा तर दुसऱ्या सामन्यात पाँडिचेरी च्या तुथिक्षा ए या खेलदुवर ३-० आसा विजय मिळवले.

तिच्या पहिल्या टप्प्यात साखळी सामन्यांतील विजयामुळे बाद फेरीत प्रवेश मिळावला. बाद फेरीत १० वर्षाच्या आद्याने बंगालच्या घोष चौधरी मानवी या खेळाडूवर ११-४,१२-१०,

११-७ (३-०) आसा सोपा विजय मिळवत उप उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत आद्या समोर हरयानाची असणारी आठव्या मानांकित आवनी जांगु या खेळाडूंचे कडवे आव्हान होते ते आद्या ने ११-३, ११-९, ११-५ आसे सरळ सेत मध्ये मोडीत काढून उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश केला. चुरशीच्या झालेल्या उपांत्य-पूर्व फेरीत महाराष्ट्रच्याच जिनाया वधान या खेळाडूवर ११-७,११-७,७-११,१५-१३ (३-१) आसा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश करत आसाम ची असणारी चौथे मानांकन प्राप्त गोगोई इशानी या खेळाडूवर ११-७,११-४,११-९ (३-०) आसा सहज व सोपा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम मानांकित आसामच्या पौल दिविजा या खेलदुकडून (१-३) आसा पराभव स्वीकारावा लागल्याने आद्याला उप विजेते पदावर समधना मानावे लागले.

आद्या पूजा महेश बाहेती हे 

' खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात ' प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आसून ती स्कॉटिश ऍकॅडमी या शाळेची विद्यार्थिनी आहे.

आद्या च्या या यशासाठी विक्रम हत्तेकर, नरसिंह चाटे, सूरज भुजबळ, रोहित जोशी, तुषार जाधव, श्रीकांत दुधारे, पवन कदम, पियूष रमावत, साक्षी देवकते, सौरभ मस्के, हर्षवर्धन घाडगे यांनी सहकार्य केले.


या उज्वल यशाबदल जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावांदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, नानक सिंग बस्सी, सुयश नाटकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष समशेर भैय्या वरपुडकर, कार्याध्यक्ष डॉ.माधव शेजुळ , जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत, परभणी क्लब चे सचिव विवेक नावंदर, जिल्हा सचिव गणेश माळवे, डी.पी.पंडीत, वरिष्ठ खेळाडू,पालक यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या