नांदेड:(दि.१८ ऑक्टोबर २०२४)
भगवान रजनीश ब्लेसिंग्ज इंटरनॅशनल मेडिटेशन कम्यूनद्वारे दि. १७ ऑक्टोबर, गुरुवार रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सकाळी ६ ते ८:३० दरम्यान शिवमंदिर, चैतन्य नगर, एअरपोर्ट रोडवर नगर कीर्तन उत्साहात संपन्न झाले.
शिबिर संचालक स्वामी गोपाळ भारती, स्वामी प्रेम प्रशांत, मा प्रेम सुगंधा यांच्याद्वारे संचालित या नगर कीर्तनामध्ये गोविंद बोलो, हरी गोपाल बोलो या कीर्तन ध्यान गीताच्या तालावर भगवान रजनीश संन्यासी, साधक आणि प्रेमींनी उत्साहात नृत्य केले तसेच रजनीश आये; आनंद लाये, भगवान रजनीश की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.
शेवटी लिसनिंग मेडिटेशन व नृत्य ध्यानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या नगर कीर्तनात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनेक नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. विशेषतः नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन नगर कीर्तनाचा आनंद घेतला तसेच माजी उपमहापौर प्रा.सुनील नेरळकर, तुलसी पेंट्सचे ओनर श्री. सुरेश धूत, सुभाष फाळके, सौ. संगीता देशमुख, वंदना, डॉ.अजय गव्हाणे, शामसुंदर मोतेवार, महेश वडजकर, भागवत कापसे, अरविंद पटेल, विजय देवसरकर, डॉ. भास्कर आवटी आदी साधक व प्रेमींनी सक्रिय सहभाग घेतला आणि सेवानिवृत्त प्रा.जी.एल.सूर्यवंशी, डॉ. दिगंबर भोसले आदी स्नेहींनी साधकांना यादरम्यान प्रोत्साहन दिले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा