विज्ञानवादी व विवेकवादी दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी -डॉ. मनीष गायकवाड


नांदेड:( दि.२६ ऑक्टोबर २०२४) 

           आज शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे; मात्र शिक्षण फक्त पदवीसाठी नाही, तर विज्ञानवादी व विवेकवादी दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी असले पाहिजे; कारण राष्ट्र उन्नतीसाठी शिक्षण अत्यंत गरजेचे आहे, असे विचार अमरावती येथील डॉ.मनीष गायकवाड यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षानिमित्त श्री.शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचलित, जे. डी. पाटील सांगलुदकर महाविद्यालय ,दर्यापूर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड संलग्नित यशवंत महाविद्यालय, नांदेडच्या पदवी ,पदव्युत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने 'डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन व कार्य ' या विषयावरील व्याख्यानात व्यक्त केले. 

            माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित प्रबोधन व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

            पुढे बोलताना डॉ.गायकवाड म्हणाले की,विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खंजिरी, संत गाडगे महाराजांचा झाडू आणि भाऊसाहेबांचा खडू या तिघांनी क्रांती केली आहे. त्यामध्ये विशेष करून विदर्भामध्ये शैक्षणिक क्रांती ज्यांनी केली अशा डॉ.पंजाबराव देशमुख यांचे विचार सर्वापर्यंत पोहोचविणे, नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देणे हे आपले कर्तव्य आहे. 

            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे होत्या.

            अध्यक्षीय समारोप करताना डॉ. सोनकांबळे म्हणाल्या की,  महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महात्मा फुले, राजर्षी शाहू,  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. डॉ.पंजाबराव देशमुख क्रांतिकारक विचाराचे व फुले-शाहू-आंबेडकर  या परंपरेचे पाईक होते; म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे; ही आजची प्रमुख गरज बनली आहे. 

          सुरुवातीला एम.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.पूजा वाठोरे यांचे स्वागत गीत झाले. 

          व्याख्यानाचे उद्घाटन भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख व भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण या दोन्ही महापुरुषांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने  झाले.

          प्रास्ताविक जे.डी.पाटील सांगलूदकर महाविद्यालय, दर्यापूरचे प्राचार्य डॉ.अतुल बोडके यांनी केले.

          यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी संचालक डॉ.राजेश बुरंगे, गझलकार डॉ.राजेश उमाळे, डॉ. विनोद कोकणे,प्राचार्य डॉ.विकास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

           सूत्रसंचालन इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे यांनी केले तर आभार डॉ.राजेश बुरंगे यांनी मानले. 

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिवराज बोकडे, डॉ.संगीता शिंदे(ढेंगळे), डॉ.साईनाथ बिंदगे, प्रा.राजश्री भोपाळे  यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, पोषट्टी अवधूतवार, आनंदा शिंदे यांनी सहकार्य केले. 

          कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनिंची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

टिप्पण्या