मुंबई :-- समाजात अनेक पालकवर्ग आपल्या पाल्यांवर आपल्या मतांप्रमाणे शैक्षणिक बोजा लादत असतात. पालकांनी असे न करता त्यांनी विध्यार्थ्यांच्या पसंतीचा अभ्यासक्रम निवडवा जेणेकरून त्यांना अभ्यास करणे सोपे होईल. असे मार्गदर्शन साप्ताहिक - प्रकट महाराष्ट्रचे संपादक - दत्ताराम दळवी यांनी आदर्श शिक्षण समितीने आर्य समाज लोअर परेल येथे आयोजित केलेल्या 63 व्या वर्धापनदिन व विध्यार्थी गुणगौरव समारंभात केले.
आदर्श शिक्षण समिती दरवर्षी इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते नुसार निवड करून त्यांना शैक्षणिक मदत करून व शिष्यवृत्ती देऊन प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांचा गौरव करते. याही वर्षी गुणवत्ते नुसार निवड करून विध्यार्थ्यांना बॅग आणि रोख शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. आदर्श शिक्षण समितीचे तह हयात विश्वस्त श्री शांताराम गोवळकर यांनी समितीला प्रसिद्धीच्या झोतात ठेऊन आर्थिक बाजू सुद्धा भक्कम करून ठेवली म्हणून आपण आज असे खर्चिक कार्यक्रम घेऊ शकतो. असे अध्यक्ष - सुरेश पवार हे आपल्या प्रस्थावनेत म्हणाले. शांताराम गोवळकर आणि शंकर पाटणकर यांच्यासारखे कामकारणे आम्हाला जमणार नाही पण तसे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे उपाध्यक्ष - अनंत दाभोळकर आणि मत मांडले.
विध्यार्थ्यानी mpsc सारखे अभ्यासक्रमांची निवड करून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावेत असे सांगून त्यासाठी होतकरूना मी केव्हाही मार्गदर्शन करण्यास तयार आहे. त्यांनी कधीही मला संपर्क करावा. असे मार्गदर्शन सहाय्यक आयुक्त आयकर विभाग श्री. हरीश केळकर यांनी करून एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने दिलेल्या देणगी बद्दल आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातिला अनंत दाभोळकर यांनी गेल्या 62 वर्ष्याच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श शिक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी फार मोठी मदत केली. तर सरचिटणीस भरत पाटणकर यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थित सर्व सभासद व पारितोषक विजेत्यांचे आभार मानले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा