भारतात रेल्वे कामगारांची संख्या जवळजवळ अकरा लाख असून, मध्य रेल्वेच्या कामगारांची संख्या जवळपास एक लाख आहे. या उद्योगात कामगार कायद्यानुसार युनियन मान्यतेसाठी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक केली जाते. या उद्योगात नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला पुन्हा मान्यता मिळविण्यासाठी ४ ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान निवडणूक होणार असून, या निवडणुकीचे नामांकन अर्ज २५ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील महाप्रबंधक कार्यालयात कामगारांच्या उपस्थित भरण्यात आले. याप्रसंगी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांनी सीएसटी येथे मोर्चा नेऊन आपले शक्तिप्रदर्शन केले.
मिटिंग सुरू होण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि ८ पासून DRM कार्यालय मार्गे उपनगरीय लॉबीपर्यंत कामगार मोर्चाने गेले, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे (AIRF) महामंत्री कॉ. शिवगोपाल मिश्राजी आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ( NRMU ) व कोकण रेल्वेचे महामंत्री (CRKR) कॉ. वेणू पी. नायरजी यांनी पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर जनरल मॅनेजर ऑफिस कंपाऊंड क्षेत्राकडे मोर्चा पुढे जाऊन मिटिंग सुरू झाली. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉ. वेणू नायरजी यांनी आपल्या तेजस्वी भाषणातून चांगला संदेश देऊन रेल्वे कामगारांचा उत्साह वाढविला. त्यानंतर ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचे महामंत्री कॉ. शिवगोपाल मिश्राजी यांनी सरकारची सद्यस्थिती, युनियनची गरज आणि पेन्शन योजनेच्या UPS गोंधळाबद्दल बोलून इंटक प्रणित संघटना कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसते. उदा. १९६०,१९७४ चा संप फोडून सरकारची लॉयल्टी व आपल्या मुलांना रेल्वेत नोकरीत सामावून घेतले. AIRF/ NRMU ला 100 वर्षाचा इतिहास या युनियनला आहे. UPS मध्ये राहिलेले मुद्दे सुद्धा चर्चेद्वारे सोडविले जातील याची हमी यावेळी त्यांनी कामगारांना दिली व ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या निवडीनुसार UPS किंवा NPS घेण्यासाठी ऑप्शन देण्यात आले आहे त्यांनी ऑप्शन देताना विचार पूर्वक निवड करावी हे सुद्धा सांगितले आहे.NRMU व AIRF सारख्या संघर्षशील युनियनची
कर्मचार्यांना गरज का आहे. हे स्पष्ट केले.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या अध्यक्षा कॉ. कामाक्षी बागलवाडीकर यांनी सर्वांचे आभार मानले.
रेल्वे मुख्यालय व विभागातील सर्व पदाधिकारी, युवा, महिला कॉम्रेड, सर्व DC चे पदाधिकारी आणि विभागातील सर्व सक्रिय सदस्यांनी या मिटिंगमध्ये सहभाग घेतल्यामुळे मिटींगला हजारोच्या संख्येने उपस्थिती होती . याप्रसंगी ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे झोनल सचिव कॉ. पी. जे. शिंदे,
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सर्व सहाय्यक सचिव कॉ. विवेक नायर, कॉ. पी. टी. एस. राजा, कॉ. श्याम नायक, कॉ. बी.एल. यादव, कॉ. विनय सावंत कॉ. संतोष कुमार, कॉ. आर. के. मलबारी, WP, सर्व मंडळाचे अध्यक्ष, मंडळ सचिव, युवा महिला, शाखा पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते यांच्या साक्षीने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने मान्यतेच्या निवडणुकीसाठी नामांकन मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी श्री. सहर्ष बाजपेयी यांना दिले
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा