नांदेड:(दि.२२ऑक्टोबर २०२४)
समाजशास्त्र ही ज्ञानशाखा सर्वसामान्य ज्ञान शाखा असून इतर सर्वच ज्ञानशाखेंना सामावून घेण्याची क्षमता समाजशास्त्रात असते; म्हणून समाजशास्त्र सर्व शास्त्रांची जननी आहे, असे उद्गार डॉ.एस.पी.ढोले यांनी समाजशास्त्र या विषयाचे महत्त्व सांगताना यशवंत महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी व्याख्याते म्हणून केले.
यशवंत महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष:२०१४-२५ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आले. या अभ्यास मंडळाच्या वतीने ' समाजशास्त्र,: तत्व आणि व्यवहार' या विषयावर डॉ.एस पी.ढोले, समाजशास्त्र विभागप्रमुख, श्री. दत्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हदगाव यांच्या विद्वत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी भूषविले.
समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.बी. एम.कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.बी.आर.भोसले, प्रा.शंकर मार्कड, प्रा.पूजा मिरगेवार यांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शंकर मार्कड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय समाजशास्त्र विभागाचा विद्यार्थी गणेश विनकरे यांनी दिला तर आभार विनोद कोलते या विद्यार्थ्याने मानले.
कार्यक्रमात भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे अभ्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा डॉ. एस.पीढोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात डॉ.एस.पी.ढोले यांनी, समाजशास्त्र या विषयाची सर्वांगीण उपयुक्तता याविषयी सविस्तर व्याख्यान दिले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. कविता सोनकांबळे यांनी, भारतीय समाजाच्या विकासात्मक वाटचालीस समाजशास्त्राचे योगदान कसे राहिले आहे, याविषयी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले.
माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांचे सहकार्य लाभले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा