L मुंबई दि.२७:श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान आयोजित १३व्या चुरशीच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत महर्षी दयानंद कॉलेजने सादर केलेल्या 'ब्रह्मपुरा'ने अंतिम फेरीत मानाचा विघ्नहर्ता करंडक जिंकून स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावले.माटुंग्याच्या यशवंत नाट्यगृहात नुकताच मोठ्या दिमाखात हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
या स्पर्धेचे नाटककार कुमार सोहनी,ज्येष्ठ रंगकर्मी नारायण जाधव, डॉ.श्याम शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले,सिनेनाट्य अभिनेते सतीश सलागरे, रमेश रोकडे तसेच मनोहर सकपाळ(उद्योजक) सदानंद चांदे,सुरेशचंद्र तारकर समाजसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष दत्ता मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.विशाल साळवे यांनी सूत्रसंचलन केले.
श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या एकांकिका स्पर्धेत सिडनहॅम महावि द्यालयाने सादर केलेल्या"अविघ्नेया"या एकांकिकेला द्वितीय,ज्ञान साधना महाविद्यालयाने सादर केलेल्या "कुक्कर" एकांकिकेला तृतिय पारितोषिक मिळाले.उत्त्तेजनार्थचे पारितोषिक कलाराग नेरुळच्या "ऑन टॉप ऑफ"एकांकिकेला मिळाले.
लेखनात प्रथम मोहन बनसोडे (अविघ्नेया),तर द्वितीय पारितोषिक रोहित कोटेकर(ब्रम्हपुरा) यांना मिळाले.
अभिनयात (पुरुष) प्रथम-साई निरावडेकर(अविघ्नेया), द्वितीय- स्वप्निल पाटील (ब्रह्यपुरा) (स्त्री) प्रथम-श्रावणी ओव्हाळ (अविघ्नेय) द्वितीय रिया सूर्यवंशी (ऑन द टॉप)
नैपथ्य-प्रथम यश पवार (ब्राह्मपुरा) द्वितीय सिध्देश नांदलोस्कर (कुक्कर)
Is संगीतात प्रथम- अक्षर घांगर (अविघ्नेया). द्वितीय-संकल्प झोडे(ब्रह्मपुरा)
प्रकाश योजना-प्रथम सिध्देश नांदलस्कर (कुक्कर), द्वितीय-राजेश शिंदे (ऑन टॉप ऑफ) यांना पारितोषिके मिळाली.
संस्थेच्या वतीने राज जैतपाळ, अमन दळवी,विजय सक्रे,महेंद्र कुरघोडे,श्याम चव्हाण, यांनी काम पाहिले ••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा