वाचन‌ संस्कृती समृद्ध करणे काळाची गरज!रामिम संघ वाचना लयाचा आज वाचन‌ प्रेरणा दिन संपन्न


  मुंबई दि.१५:ज्या देशाची ग्रंथसंपदा विपूल,तो‌ देश‌ समृध्द,असे म्हटले जाते. ही गोष्ट लक्षात घेता,आजच्या पिढीने वाचन संस्कृती जोपासून ग्रंथसंपदा वाढवावयास हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रफुल्ल फडके यांनी येथे बोलताना केले आहे.

    राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाच्या वतीने आज भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त परेलच्या मनोहर फाळके सभागृहात वाचन प्रेरणादिन संपन्न झाला.त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार‌ आणि लेखक प्रफुल्ल फडके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ग्रंथालयाचे अध्यक्ष, संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

     प्रफुल्ल फडके आपल्या भाषणात पुढे म्हणाले,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते या नेतृत्वाने अनेक उपक्रमांना प्रोत्साहन देताना,कामगार भागात एक अद्यावत वाचनालय उभे केले.एक काळ असा होता,की त्या वेळेच्या पिढीच्या-पिढी वाचन संस्कृतीत झपाटलेल्या दिसल्या.परंतु आजच्या यूथ पिढीने मोबाईलच्या आहारी जाऊन वाचन‌ संस्कृतीकडे‌ पाठ फिरविली आहे,त्यातून सुद्रुढ समाजव्यवस्था घडवि ण्याचा उद्देश मागे पडत चालला आहे.आजची समाजव्यवस्था वैचारिक पायावर‌ खंबीरपणे उभी रहाण्यासाठी वाचकांचा लेखकाशी सातत्याने सुसंवाद घडला पाहिजे,त्यातूनच सामाजिक उत्कर्ष होऊन‌ देश‌ समृध्द होईल.

  गोविंदराव मोहिते समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन म्हणाले‌,भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी जमिनीवरुन जमिनीवर मारा करणा-या क्षेपणास्त्रांचा शोध लावून शक्तीशाली राष्ट्र म्हणून भारताची जगात मान उंचाविली. वाचन हाच केंद्रबिंदू मानून आपले विशाल कर्तृत्व घडविणा-या माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना ख-या अर्थाने उजाळा द्यायचा असेल तर‌ वाचन‌ संस्कृती अधिक जोमाने‌ वृध्दिंगत करावी लागेल. महात्मा गांधी,डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले‌ यांच्या सारख्या महात्म्यां नी हाच विचार या मातीत रुजविला आहे,हे‌ विसरून चालणार नाही, असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.प्रारंभी ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.या प्रसंगी खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा‌ शिर्सेकर,राजन भाई लाड, सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे, लेखक-काशिनाथ माटल,रंगकर्मी राघवकुमार उपस्थित होते.वाचक प्रणय सुर्वे,श्रीमती उषा सोहनी,दिक्षा गुंजाळ यांनी आपले विचार मांडतांना वाचन संस्कृती वाढविण्याचे आवाहन केले.प्रारंभी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.या‌ औचित्याने गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदान करुन,आजचा वाचक प्रेरणादिन‌ संपन्न करण्यात आला.••••••

टिप्पण्या