*'यशवंत ' मध्ये दुग्धशास्त्र विभागातर्फे दोन दिवसीय पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन सेमिनार संपन्न*

 


नांदेड ( दि.१३ ऑक्टोबर २०२४)

          श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दुग्धशास्त्र विभागाद्वारे दोन दिवसीय पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन सेमिनार आयोजित करण्यात आले होते.

           याप्रसंगी साधन व्यक्ती प्रा.आशिष नागला ( डायरेक्टर ऑफ आय कॅन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट नांदेड, आयएसओ सर्टिफाइड) होते.

          त्यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. आपल्या प्रभावी शैलीने त्यांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. 

           कार्यक्रमाचे आयोजन दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजकुमार सोनवणे आणि प्रा.बाळासाहेब लांडगे यांनी केले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता आणि कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पद्मराणी राव, डॉ.अजय टेंगसे, प्रा.कैलास इंगोले, प्रा.माधव दुधाटे, प्रा.चैतन्य देशमुख, प्रा. रत्नमाला मस्के, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या