माहुरात महायुतीची समन्वय बैठक संपन्न.


माहुर (प्रतिनीधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 26ऑक्टोबर 2024रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे विधानसभा प्रमुख वैजनाथ करपुडे यांच्या अध्यक्षतेखाली तर भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सुधाकर भोयर, यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक स्थानिक एकविरा धाम येथे पार पडली यावेळी तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडेकर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अमित राठोड, शिवसेना शिंदे गटाचे हिरासिंग चव्हाण , तालुका संघटक विनोद सुर्यवंशी पाटील,सदानंद पुरी,रीपाई आठवले गटाचे रफीकभाई,यांची उपस्थिती होती.


या बैठकीत निवडणुकी संदर्भात  महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला असता कार्यकर्त्यांकडून मौलीक सुचना व अडीअडचणी समजून घेतल्या याबैठकीला मार्गदर्शन करताना वैजनाथ करपुडे पाटील म्हणाले की हि  निवडणूक जिंकण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकदिलाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या बैठकीला जेष्ठ कार्यकर्ते जोतीराम राठोड, नंदकुमार जोशी,विजय आमले, विलास चौधरी, नगरसेवक गोपु महामुने, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनायक मुसळे, पुरुषोत्तम लांडगे,मनोहर भगत,मनोज पुरी, निलेश तायडे, बबनराव गेंटलवार, विलास टिपकर बाबुभाई वाईवाले,शंकर भालेराव,महीला मोर्चाच्या प्रदेश सदस्या सौ पद्माताई गिरे, जिल्हा उपाध्यक्षा सौ राधा उपलेंचवार,सुजाता कांबळे,अर्चना दराडे,स्वाती आडे,निर्मला जोशी,यांचेसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे सुत्रसंचलन अपिल बेलखोडे यांनी केले तर निळकंठ मस्के यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या