बंजारा लमाण तांडा समृद्धी समितीच्या सदस्यपदी सागर राठोड व मनिष राठोड यांची निवड.


राम दातीर 

माहूर (प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील मोजे भोरड व बंजारा तांडा येथील सागर गंभीरा राठोड व मनीष मुकुंद राठोड यांची संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेअंतर्गत अशासकीय सदस्य म्हणून तीन वर्षा करिता निवड करण्यात आली. 

यात तांडा समृद्धी योजना अंमलबजावणीबाबत,बंजारावस्ती घोषित करणे, गावठाण जाहीर करणे तांड्याला महसुली गाव महसुली गाव घोषित करण्याची कारवाई करणे स्वतंत्र तांडा ग्रामपंचायत स्थापन, करण्याची कार्यवाही करणे व इतर असे काम मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून सदर माहूर तालुका समिती निवड करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या हस्तेखाली बंजारा लमान समाजाचे अशासकीय सदस्य म्हणून सागर राठोड व मनिष राठोड यांची सर्वानुमते अशासकीय सदस्य म्हणून तीन वर्षाकरिता निवड करण्यात आलेली आहे.

 या सदस्यांना पुढील आपल्या समाजासाठी स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा देणे, तांड्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे, इतर अनुषंशिग अनेक कामासाठी पाठपुरावा करणे तसेच योजनेसाठी जनजागृती करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 

असल्यामुळे बंजारा समाजाच्यावतीने या निवडीबद्दल सागर राठोड व मनिष राठोड यांचेवर माहूर तालुक्यातील नागरिकांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या