भारत सरकारने कांडला बंदराचे अध्यक्ष श्री. सुशील कुमार सिंग यांची मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनच्या वतीने २१ ऑक्टोबर २०२४ रोजी बॅलार्ड पियर येथील पोर्ट भवनमधील बोर्ड रूममध्ये ज्येष्ठ कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, सेक्रेटरी विद्याधर राणे, विजय रणदिवे, मनीष पाटील, खजिनदार विकास नलावडे, उपाध्यक्ष शीला भगत, रमेश कुऱ्हाडे, संघटक चिटणीस विष्णू पोळ, मीर निसार युनूस, प्रवीण काळे, आप्पा भोसले, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे, मुख्य लेखाधिकारी श्रीमती माधुरी वराडे उपस्थित होते.
सदिच्छा भेटीप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांनी अध्यक्षना सांगितले की, मुंबई पोर्टच्या विकासात आमच्या युनियनचे आपणास संपूर्ण सहकार्य मिळेल. उद्योग टिकला तर कामगार टिकेल हे फार महत्वाचे आहे. युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा अध्यक्षांना परिचय करून दिला. याप्रसंगी अध्यक्षांना सांगितले की, नवीन वेतन कराराची लवकर अंमलबजावणी करणे, दिवाळीपूर्वी बोनस देणे, व वेतन थकबाकी एकरकमी देणे. या कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. यानंतर मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष सुशील कुमार सिंग यांनी सांगितले की, मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या विकासात कामगारांच्या सहभाग महत्त्वाचा आहे. दिवाळीपूर्वी बोनस देण्यात येईल, कामगारांची वेतनवाढ लवकरच लागू करण्यात येईल व वेतन कराराची थकबाकी एकरकमी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. याप्रसंगी ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख, बोर्ड मेंबर ज्ञानेश्वर वाडेकर, युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे, फिलिप्स व युनियनच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष सुशील कुमार सिंग यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा