धर्म, पंथ,जात बघून नाही,

 

धर्म, पंथ,जात बघून नाही,

कल्याणकारी कार्य बघून मत द्यावं


उगाच कशाला पाचशे हजार रुपयांसाठी,

चुकीच्या नेत्यास राजकीय पद द्यावं?


नसावा द्वेष इतर जातीधर्मांचा,

देशासाठी धर्म चार भिंतीमध्येच ठेवावा


युवकाने जरा मोबाईलमधून बाहेर यावं,

देशात काय चाललयं डोकावून पहावं


फक्त सरकारी नोकरीचा दुराग्रह न ठेवता ,

समाजसेवा आणि इतर क्षेत्रातही जावं


                       -कु.गोदावरी कानशुक्ले,

                                 बी.ए.प्रथम वर्ष,

                 यशवंत महाविद्यालय, नांदेड.

टिप्पण्या