विद्याधर राणे यांची अंतरराष्ट्रीय ग्लोबल युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड

 ग्लासगो, स्कॉटलंड, युनायटेड किंगडम येथे  १५ व १६ ऑक्टोंबर २०२४ रोजी  झालेल्या "इंडस्ट्रियल ग्लोबल युनियन शिपबिल्डिंग आणि शिपब्रेकिंग वर्ल्ड कॉन्फरन्स"  या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इंडस्ट्रियल ग्लोबल युनियन शिपबिल्डिंग आणि शिपब्रेकिंग क्षेत्राचे उपाध्यक्ष म्हणून  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी आणि अलंग सोशिया शिप रिसायकलिंग जनरल वर्कर्स असोशिअशनचे जनरल सेक्रेटरी विद्याधर राणे यांची पुन्हा एकदा एकमताने निवड झाली आहे.

या अगोदर  नागासाकी, जपान येथे  २०१४ आणि  सिंगापूर येथे  २०१८ साली  याआधी झलेल्या परिषदा मध्ये  विद्याधर राणे यांची  एकमताने निवड झाली होती 

विद्याधर राणे यांची २०१४  पासून इंडस्ट्रियल ग्लोबल युनियन शिपबिल्डिंग आणि शिपब्रेकिंग उपाध्यक्ष म्हणून सतत सेवा सुरू आहे. ग्लासगो येथे त्यांची पुन्हा निवड झाल्याने जागतिक स्तरावर या क्षेत्रातील त्यांचे समर्पण आणि नेतृत्व बळकट झाले आहे. .

 आपला 

मारुती विश्वासराव 

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या