*शालेय राज्य तलवारबाजी क्रीडा स्पर्धा साठी प्रसाद महाले ची निवड*

 


परभणी (.           )क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व छत्रपती संभाजी नगर क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 23 ते 26 ऑक्टोंबर 2024 दरम्यान विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातून आठ विभाग सहभागी होणार आहे या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नूतन विद्यालयाचे चि. प्रसाद संजय महाले या खेळाडूची विभागीय स्पर्धेमधून निवड झाली असून या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे या खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख  गणेश माळवे , प्रशांत नाईक, संजय भुमकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे या यशाबद्दल नूतन विद्यालय संस्थेचे अध्यक्ष  डॉ. एस .एम. लोया ,सचिव व्ही.के. कोठेकर उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, कार्यकारिणी सदस्य मकरंद दिग्रसकर,नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही. पाटील  उपमुख्याध्यापक के.के. देशपांडे,  जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे ,यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या