*सेलूत सामूहिक रामरक्षा पठणात 3500 विद्यार्यांचा सहभाग

 


 *राष्ट्रसंत श्री गोविंद देव गिरीजींची उपस्थिती*

*गिता परिवार व समर्थ & गजानन अँग्रोचे आयोजन*

सेलू, प्रतिनिधी 

येथील गीता परिवाराच्या वतीने समर्थ ऍग्रो इंडस्ट्रीज परिसरात सामूहिक रामरक्षा पठणात  रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी 

शहरातील विविध शाळेसह ग्रामीण भागातील शाळेतील ३५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

       राष्ट्रसंत श्री गोविंद देव गिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीराम कथेचे संयोजक विजयकुमार बिहाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून  गीता परिवाराचे मराठवाडा प्रमुख लक्ष्मीकांत करवा, सचिव संगीता तिवारी, महेशराव खारकर, रामेश्वरजी राठी, हरिकिशनजी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. 


लिखित पिंपरी येथील संत तुकाराम गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार सादर केले.  नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  राष्ट्रीय योग प्रशिक्षक डी डी सोन्नेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतमय योगासनासह  सूर्यनमस्कार सादर केले ,तसेच प्रभू रामचंद्रांच्या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीतापठण केले. सच्चिदानंद डाखोरे यांच्या संचाने विविध देशभक्तीपर गीते सादर करून स्वामीजींसह उपस्थितांची दाद मिळवली.

       यानंतर नूतन विद्यालय, प्रिन्स इंग्लिश स्कूल, नूतन इंग्लिश स्कूल ,स्वामी विवेकानंद विद्यालय ,न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल ,शारदा विद्यालय, उत्कर्ष विद्यालय, नूतन प्राथमिक विद्यालय, पोदार इंग्लिश स्कूल, यशवंत प्राथमिक विद्यालय, न्यू हायस्कूल, केशवराज बाबासाहेब विद्यालय, नूतन कन्या प्रशाला, ज्ञानतीर्थ विद्यालय, यशवंत जिल्हा परिषद प्रशाला, व लिखित पिंपरी येथील संत तुकाराम गुरुकुल आदी विद्यालयालयातील  ३५०० मुला- मुलींनी सामूहिक रामरक्षा पठण करून स्वामीजीसह उपस्थितांकडून दाद मिळवली .


*भारत देशावर प्रेम करा...स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज*


 मोठ्या संख्येने उपस्थित सर्व बालगोपाळांचे मनापासून अभिनंदन करताना, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की ,नियमित रामरक्षाचे पठण केल्यानंतर कोणतेही संकट येणार नाही .तर आलेले संकट सहजतेने दूर होईल .त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित रामरक्षाचे पठण करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दररोज स्मरण करावे .आपल्या भारत देशावर प्रेम करावे ,असे मोलाचे मार्गदर्शन स्वामीजींनी विद्यार्थ्यांना केले. ते म्हणाले की ,भारत माता की जय , लव्ह भारत असे म्हणावे.  उपस्थित विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, रामरक्षा व गीता पठण,  रामरक्षा व श्रीमद्भगवद्गीता पठण ,उत्कृष्टपणे सादर केले आहे .त्यामुळे त्यांच्यासह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदांचे देखील त्यांनी अभिनंदन केले .यानंतर स्वामीजींनी सेलू शहरातील अत्रे नगर परिसरात जाऊन ह.भ.प.योगेश महाराज साळेगावकर यांच्या स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तनकुल येथे भेट देऊन, तेथील विद्यार्थ्यांचे देखील स्वागत व मार्गदर्शन केले.उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संयोजकांच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. कारकार्यक्रमा साठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, सितारामजी मंत्री,उद्योजक जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती,संजय लड्डा, इंडस्ट्री असोसिएशन चे अध्यक्ष ओमप्रकाश डागा श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, अँड. अनिरुद्ध जोशी,डॉ.जनार्धन गोळेगावकर,आनंद मालाणी, डॉ सुजीत मालाणी, शिवनारायण मालाणी, अँड उमेश खारकर,सौ.वसुधा खारकर, सौ वंदना मंत्री,सौ किरण राठी,प्रसाद खारकर,प्रविण माणकेश्वर,आदींची उपस्थिती होती. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्पण मंत्री, सुत्रसंचलन सतीश बाहेती व सौ कांचन बाहेती  यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गीता परिवार सदस्य,सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पत्रकार आदींनी परीश्रम घेतले.

टिप्पण्या