पुणे :- टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
टेनिस हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडीया श्री खंडेराय प्रतिष्ठाण बालेवाडी, पुणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असो.वतीने टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कप आयोजन पुणे येथे दि.१६ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले. पुरुष गटात: महाराष्ट्र,तर महिला गटात: केरळ सुवर्णपदक ,महाराष्ट्रास मिश्र दुहेरीत रौप्यपदक पटकावले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गणपतराव बालवडकर (चेअरमन टेनिस व्हॉलीबॉल महा. असो/श्रीखंडेराय प्रतिष्ठाण,)प्रमुख पाहुणे : विजय संतान ( क्रीडा उपसंचालक अमरावती)डॉ व्यंकटेश वांगवाड (टेनिस व्हॉलीबॉल जनक) शरदचंद्र घाररुकर (अध्यय शा.शि शिः महासंघ) मिलिंद क्षिरसागर (उपाध्याय शा.शि शि महासंघ)धर्मविरसिंग जडेजा (कोषाध्याक्ष टेनिस व्हॉलीबॉल महासंघ) नागेश्वर राव (सरचिटणीस कर्नाटक असो.)डॉ.दिनेश शिगारम (राज्य कोषाध्यक्ष)रामेश्वर कोरडे (विभागीय सचिव महाराष्ट्र) अंजली दळवी (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त) प्रगती भावसार, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माळवे (टेनिस हॉलीबॉल सचिव महाराष्ट्र) यांनी केले.
प्रा.डॉ. टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ वेंकटेश वांगवाड त्यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त व नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने१९८९ ते १९९१ बी.एड. / एम.एड. चे
अशा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी मिलिंद क्षिरसागर व प्रा.अजित नगरकर यांनी सत्कार केला सत्कार केला.
अध्यक्षीय समारोप गणपतराव बालवाडकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. रितेश वांगवाड तर आभार प्रदर्शन सचिन भोसले यांनी मानले.
फेडरेशन कप साठी देशातील महाराष्ट्र , गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, ओरीसा, झारखंड, दिल्ली, पॉडेचरी, मध्यप्रदेश , पंजाब,पुरुष व महिला पाञ १६ संघाचा समावेश आहे.
पुरुष गटात अंतिम सामन्यात महाराष्ट्र वि. पॅडेचरी दरम्यान महाराष्ट्र संघाने 2:0 सरळ सेट मध्ये सुवर्णपदक पटकावले.पॉडेचरी रौप्यपदक , केरळ कांस्यपदक तर महिला गटात गुजरात वि. केरळ दरम्यान 2:0 सेट मध्ये केरळ संघाने सुवर्णपदक तर गुजरात रौप्यपदक, मध्यप्रदेश कांस्यपदक विजेती.
मिश्र दुहेरीत गटात केरळ वि महाराष्ट्र दरम्यान अतितटी लढतीत 2:1 सेट मध्ये केरळ सुवर्णपदक, महाराष्ट्र रौप्यपदक, तर दिल्ली कांस्यपदक पटकावले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संदिप भोसले, आशिष ओबेरॉय, गणेश पाटील, राजेंद्र मागाडे आदी परीश्रम घेत आहे
addComments
टिप्पणी पोस्ट करा