राज्य शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा शानदार उद्घाटन. खेळाडूंना बारा महिने खेळत रहावे : खा. संजय जाधव



परभणी (. )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा टेबल टेनिस असोशिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने

राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा २०२४-२५

उद्घाटन दि. २४ सप्टेंबर २०२४ मंगळवार सकाळी ११ वा. खा. संजय जाधव यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल परभणी येथे उद्घाटन करण्यात आले.  

याप्रसंगी खा. जाधव म्हणाले खेळाडूंनी बारा महिने खेळांचा सराव करावा. त्यांना लागणाऱ्या क्रीडा सुविधा शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर आहोत. 

 कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी (भा.प्र.से) रघुनाथ गावडे होते, प्रमुख पाहुणे धैर्यशील जाधव (आयुक्त, परभणी शहर महानगर पालिका, परभणी.)

 संजय कडू (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व राज्य कोषाध्यक्ष टे.टे.असो. गणेश माळवे(सचिव, परभणी जिल्हा टेबलटेनिस असोसिएशन) ज्ञानेश्वर पंडित, सचिन पुरी,अजय कांबळे , ईश्वर कदम,शेख असद, अनिल बंदेल आदी मान्यवर उपस्थित होते 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले , सुञसंचलन प्रविण वायकोस, तर आभारप्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, रोहन औढेंकर, रमेश खुणे, चेतन मुक्तावार,प्रकाश पंडित, धिरज नाईकवाडे,योगेश आदमे ,आदी परीश्रम घेत आहेत. 

सदरील क्रीडा स्पर्धेत राज्यतील ९ विभागतील ५४ संघाच्या ४३० खेळाडूंनी सहभागी झाले आहेत. यात क्रीडा प्रबोधिनी, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर विभाग सहभागी झाले आहेत.


याप्रसंगी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू कुशल चोपडा (नाशिक) शैर्य सोमहन (पुणे) राष्ट्रीय खेळाडू आद्य बाहेती (परभणी) यांच्या पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

     १४ वर्षे मुले गटात उपांत्य फेरीत छ.संभाजीनगर व अमरावती विभाग दरम्यान ३:२ अतितटी लढतीत छ.संभाजीनगर अंतिम फेरीत तर दुसरा उपांत्य फेरीत लातूर वि मुंबई विभागात दरम्यान ३:० सेट मध्ये मुंबई अंतिम फेरीत दाखल. 

१४ वर्षे मुली गटात: उपांत्य फेरीत मुंबई वि छ.संभाजीनगर विभागात ३:२ सेट मध्ये छ.संभाजीनगर विभाग अंतिम फेरीत तर कोल्हापूर व पुणे विभाग उपांत्य फेरीत दाखल .


१७ वर्षे मुलाच्या गटात: नागपूर, मुंबई, , पुणे व क्रीडा प्रबोधिनी उपांत्य फेरीत दाखल.

१७ वर्षे मुली गटात: कोल्हापूर नाशिक, पुणे व क्रीडा प्रबोधिनी उपांत्य फेरीत दाखल.

१९ वर्षे मुले गटात: पुणे व छ.संभाजीनगर उपांत्य फेरीत दाखल तर दुसरा उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनी वि पुणे दरम्यान ३:१ सेट मध्ये पुणे विभाग अंतिम फेरीत दाखल. 

१९ वर्षे मुली गटात: उपांत्य फेरीत छ.संभाजीनगर , मुंबई, नाशिक,पुणे विभाग दाखल.

पंच प्रमुख: मधुकर लोणारे, हे काम पाहत आहेत.

टिप्पण्या