नांदेड दि.९-आगामी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी माजी खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रविंद्र पाटील चव्हाण यांना कांग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी असा ठराव आज सकाळी ११ वाजता झालेल्या जिल्हा काँग्रेस व शहर कमिटीच्या बैठकीत एकमताने पारित झाला.जिल्हाध्यक्ष बी. आर.कदम यांनी ठराव मांडला तर माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांनी ठरावाला अनुमोदन दिले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी बी.आर.कदम हे होते.
ठरावाच्या बाजूने माजी महापौर अब्दुल सत्तार, जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा डॉ रेखा चव्हाण, सुभाष रायबोळे, एकनाथ मोरे,माजी आमदार इश्वरराव भोसीकर यांनी ठरावाच्या बाजूने सकारात्मक मत व्यक्त केले.आमदार मोहनराव हंबर्डे यांनी दुरध्वनीवरून प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या नावाला होकार दिला.
.बैठकिचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी केले.
यावेळी बाळासाहेब रावणगावकर,महेश देशमुख, अब्दुल गफार, अजिज कुरेशी, सुभाष किन्हाळकर, बालाजी गाडे, गंगाधर सोनकांबळे,पप्पू पाटील कोंडेकर, प्रल्हाद पाटील,माधव पवळे, मनोहर पाटील शिंद, शंकर शिंदे, संजय शेवगावकर, मुन्ना अब्बास, विलास पावडे, विकास कदम, विठ्ठल पावडे, सतिश देशमुख, निरंजन पावडे,सुरेश हटकर, सत्यपाल सावंत, बापुसाहेब पाटील,मुनतजिब, सुभाष लोणे,शरद पवार, सुनिल वानखेडे,पप्पूबेग, प्रताप देशमुख,इंजि.नसीम पठाण, गणेश वजीरगावकर, आत्माराम वानोळे, पाटील, धनंजय उमरीकर, अनिल कांबळे, गंगाप्रसाद काकडे,जेशिका शिंदे, संतोष बारसे,रंगराव भुजबळ, आनंदसिंह ठाकूर,कुलदीप ठाकूर,संजय शर्मा,सुनिल कांबळे, गोविंद पाटील, प्रथमेश गिरी,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
.
addComments
टिप्पणी पोस्ट करा