यशवंत ' रा.से.यो.तर्फे मध्यवर्ती बस स्थानकाची साफसफाई*


नांदेड:(दि.२४ सप्टेंबर २०२४)

        " स्वच्छता ही सेवा" मोहिमेअंतर्गत श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मध्यवर्ती बसस्थानक, नांदेड येथे साफसफाई करण्यात आली 

          भारत सरकार युवा कार्य एवं खेल मंत्रालय, रा.से.यो. क्षेत्रीय निदेशालय, पुणे यांच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 'स्वच्छता ही सेवा' मोहीम पार पडण्यात येत आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, शाळा कॉलेज परिसर स्वच्छतेचे कळवले आहे; जेणेकरून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागरण होईल.

          या मोहिमेचा एक भाग म्हणून 

माजी प्र- कुलगुरु तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मध्यवर्ती बस स्थानक, नांदेड येथे (मेगा क्लिनिंग ड्राईव्ह) मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली'

         मोहिमेची सुरुवात उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांच्या शुभेच्छापर मनोगताने झाली. 

          याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी नांदेड बसस्थानकात साफसफाई केली. त्याचबरोबर स्वच्छतेची शपथ देखील घेण्यात आली तसेच विविध नारे व घोषणा देत स्वयंसेवकांनी लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली.

                'स्वच्छता ही सेवा' मोहिमेअंतर्गत बसस्थानक स्वच्छता या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.राजश्री भोपाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.श्रीराम हुलसुरे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या ११० स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. 

          या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या