*नांदेड*- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा तर्फे कर्ज घेणाऱ्या राज्यातील २००८ पासूनच्या
लाभार्थ्यांची कर्ज माफी करावी तसेच महामंडळास मिळणारा निधी वाढवावा अशी मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे यांनी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अन्याय प्रतिकार दलाच्यावतीने दिलेल्या निवेदनात तलवारे यांनी म्हटले आहे की म. फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे बौद्ध व नवबौध्द समाजातील गरजू व्यक्तींना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. यातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी असा या मागचा उद्देश आहे. शासनाने अनेकदा इतर महामंडळाच्या कर्जदारांची कर्जे माफ केली आहेत तथापी म. फुले महामंडळाची सन २००८ पासून एकदाही कर्जमाफी केली नाही. त्यामूळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून राज्यातील लाभार्थ्यांचे कर्ज माफ करावे व महामंडळास वाढीव निधी द्यावा अशी मागणी सिध्दार्थ तलवारे यांनी केली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा