नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात पर्यावरण शास्त्र विभागातर्फे नुकतीच दोन दिवसीय जल परीक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री शंकर केंडुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. वाय कुलकर्णी यांनी भूषविले. तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये पर्यावरणशास्त्र विभागाचे डॉ. आनंद आष्टुरकर यांनी पाण्याची गुणवत्ता तपासणी निकड लक्षात घेऊन दैनंदिन जीवनात पिण्याच्या पाण्याचे विविध गुणधर्म व चाचण्या करणे का महत्वाचे ठरते ह्यावर मार्गदर्शन केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यावेक्षिका डॉ. अर्चना भवानकर उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री शंकर केंडुळे यांनी या प्रकारचे जलपरीक्षण उपक्रम हे अतिशय स्तुत्य आहेत अशी प्रशंसा केली तसेच महाविद्यालयाने हा उपक्रम कन्सल्टन्सी मार्फत वर्षभरही चालूच ठेवावा अशी इच्छा व्यक्त केली तसेच यासाठी इतरही काही मदत लागल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली आणि विद्यार्थी प्राध्यापक व महाविद्यालयास शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यावरण शास्त्र विभागाच्या डॉ जान्हवी शिऊरकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ सुचिता वारंगकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ मीनाक्षी बांगर डॉ अनिता जोशी, डॉ सागर साकळे, डॉ राजेश उंबरकर, श्री किरण वाघमारे, डॉ दत्ता बडूरे, डॉ संदीप काळे हे उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी नांदेड शहरातून एकूण 40 पाण्याचे नमुने तपासण्यासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पर्यावरण शास्त्र विभागाला भेट देऊन प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदेश गायकवाड, कुणाल चव्हाण, कु सृष्टी महाबळे, कु दिशा येळगे, पायल व इतर विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा