नादेड:(दि.५ सप्टेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागप्रमुख डॉ. श्रीकांत जाधव, माजी विभागप्रमुख डॉ.पी.बी.पाठक व प्रा.एन.ए नाईक, डॉ.प्रवीण तामसेकर, प्रा.सीमा शिंदे, प्रा.आमरीन खान,प्रा.सचिन वडजे, प्रा.नीलम अग्रवाल यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून विभागातील सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी गोविंद कलके, सानिका कुंभकर्ण व समीक्षा पडलवार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांविषयी आपल्या भावना व अपेक्षा व्यक्त केल्या.
अध्यक्षीय समारोपात डॉ. श्रीकांत जाधव यांनी, सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले तसेच आई, वडील व शिक्षक ह्या तीन व्यक्ती विद्यार्थ्यांसाठी योग्य दिशादर्शकाचे काम करतात व नेहमी त्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत असतात, असे भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.
प्रा. एन.ए नाईक यांनी, महाभारताचा उल्लेख करून शिक्षकांचे महत्व व विद्यार्थ्यांचा कल कसा असावा, यावर भाष्य केले.
विभागातील इतर प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे आभार मानले व प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन सिद्धार्थ केसराळीकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद कलके, योगेश सूर्यवंशी, विशाल जाधव, द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी माणिक कल्याणकर, अनुराधा मती यांनी परिश्रम केले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा