*भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने केली शेतकऱ्यांची फसवणूक :प्रल्हाद इंगोले* बारा वर्षानंतर केवळ मुद्दल दिली
. नांदेड : कारखान्याला उसाची कमतरता असल्याने कारखान्याने ऊस लागवड प्रोत्साहन जाहीर केली. जाहीर केल्याप्रमाणे फिक्स डिपॉझिट केलेले पूर्ण पैसे न देता केवळ मुद्दल देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे या प्रकाराची चौकशी होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पूर्ण रक्कम मिळवून द्यावी अशी तक्रार रोजगार नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय नांदेड यांचेकडे केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की 2012 साली कारखान्याला उसाची मोठी कमतरता झाल्याने कारखान्याने ऊस लागवड प्रोत्साहन योजना जाहीर केली होती. त्यानुसार ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर 2012 महिन्यात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर जानेवारी मध्ये लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन 75 रुपये अतिरिक्त देण्याची जाहीर केले होते. त्यानंतर कारखान्याने सदर पैसे दिलेच नाही म्हणून अनेक वेळा आम्ही मागण्या करून आंदोलने केली. काही वर्षांनी कारखान्याने सदर पैसे हे सहा-सात वर्षानंतर दुप्पट देऊ ते फिक्स केले असे जाहीर केले. त्या घटनेला आज बारा वर्षे झाली. दोन वेळेचे फिक्स डिपॉझिट म्हटलं तर चार पट रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते परंतु कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक करत सदर योजनेची केवळ मुद्दल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी होऊन दोन वेळेच्या दाम दुप्पट रकमे एवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळवून द्यावी अशा मागणीचे निवेदन शेतकरी नेते त्याचा ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय नांदेड यांचे कडे केली आहे. ......... प्रति संपादक जिल्हा प्रतिनिधी वरील बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून प्रकाशित करावी ही विनंती. आपला प्रल्हाद इंगोले प्रदेश कार्याध्यक्ष शिवसेना प्रणित शेतकरी सेना मा.सदस्य ऊर्जा नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य
addComments
टिप्पणी पोस्ट करा