नांदेड:(दि.२१ सप्टेंबर २०२४)
कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान या योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यासंदर्भात शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, अंतर्गत माती परीक्षण आणि संगणक डाटा एन्ट्री ऑपरेटर हे कौशल्य कोर्सेस शासनातर्फे चालविण्याची परवानगी देखील यशवंत महाविद्यालयाला मिळालेली आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रासाठी महाराष्ट्र शासनाने नांदेड येथील श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाची निवड केली आहे, अशी माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी दिली आहे.
यशवंत महाविद्यालयाच्या निवडीबद्दल मा. प्राचार्यांनी महाराष्ट्र शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मा. प्रधानमंत्री महोदय श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते दि. २० सप्टेंबर रोजी व्हर्चुअल ऑनलाईन पध्दतीने झाले असून या कार्यक्रमास दुरदृष्टी प्रणालीव्दारे प्रमुख उपस्थिती महामहीम मा.राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार तसेच ज्यांच्या संकल्पनेमधून उपक्रम साकार झाला ते मंत्री मा.ना.मंगल प्रभात लोढा, सहाय्यक आयुक्त सुशिल उचले आदी मान्यवरांची होती.
यशवंत महाविद्यालयामध्ये या भव्य ऑनलाइन ई-लैंग्वेज लॅब कार्यक्रमस्थळी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अंतर्गत गुणवत्ता अनेक पक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही .पदमाराणी राव, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय मुठे, लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.मीरा फड, डॉ.प्रवीणकुमार सेलूकर, आदींची उपस्थिती होती.
शेवटी उपस्थितांचे डॉ.सुभाष जुन्ने, आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना व प्लेसमेंट समितीचे समन्वयक डॉ.मदन आंभोरे यांनी आभार मानले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीकांत जाधव, माती परीक्षण कोर्स समन्वयक डॉ.सुभाष जुन्ने, डॉ. प्रवीण तामसेकर, प्रा.नितीन नाईक, डॉ. पी.बी.पाठक, प्रा.शांतूलाल मावसकर, प्रा.एस.बी.राऊत, प्लेसमेंट कमिटीचे सह-समन्वयक डॉ. एन.बी.चव्हाण, करिअर कट्टाचे जिल्हा समन्वयक डॉ. अजय मुठे, प्रा.माधव दुधाटे, प्रा. नारायण गव्हाणे, प्रा.एस.डी.माने, जय चव्हाण, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, जगदीश उमरीकर, परशुराम जाधव, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी आणि योजनेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी कौशल्य विभाग जिल्हा सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, कौशल्य विभागाचे श्री.इरफान खान, नोडल ऑफिसर शुभम सेवनकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा