पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती सायन्स कॉलेजमध्ये साजरी*


नांदेड दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी नांदेडच्या कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी अध्यक्षीय स्थान भूषवून पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

पंडित दीनदयाल उपाध्याय हे थोर विचारवंत व चिंतक होते. देश विकासाच्या अनेक मुद्यांवर त्यांनी चिंतन केले. विचार मांडले. त्यांची विचारसरणी पुढे नेत देशाचा विकास करण्याच्या उद्देशाने दिल्लीला १९६८मध्ये दीनदयाल स्मारक समितीची स्थापना झाली. अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी तर सचिव नानाजी देशमुख होते. नानाजींनी १९७८मध्ये राजकीय जीवन संपवून समाजकार्यात उडी घेतली दीनदयाल स्मारक समितीची पुनर्स्थापना केली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्मता मानवतावादाला जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांतीची जोड देऊन दीनदयाल स्मारक समितीचे 'दीनदयाल शोध संस्थान'मध्ये परिवर्तन करण्यात आले. देशाच्या ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक सुधारणेची पायाभरणी करण्यात आली.कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाच्या उप प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

याप्रसंगी डॉ के आर गायकवाड, डॉ एस एस मोदी, डॉ प्रीता बोरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा ई एम खिल्लारे, पर्यवेक्षक प्रा एम आर मुळे, प्रा एस एफ गोरे, महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग उपस्थित राहून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून जयंती साजरी केली. 


टिप्पण्या