मुंबई दि.४: पोलिओ मुक्त देश करण्यासाठी योगदान देणाऱ्या मुंबईतील हाफकिन जीव-औषध निर्माण मंडळाला कायम व्यवस्थापकीय संचालक मिळू नये,या पेक्षा मोठी नामुष्की नाही,अशी खंत "इंटक प्रणित हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन"चे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी येथे कामगारांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली आहे.
आचार्य दोंदे मार्गावरील हाफकिन जीव-औषध निर्माण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मंगळवारी परेल,आचार्य दोंदे मार्गावरील युनियन कार्यालयात हाफकिन स्थापना दिनाच्या औचित्याने सत्यनारायणाची महापूजा पार पडली,त्या प्रसंगी इंटक प्राणीत युनियनचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कर्मचा-यांच्या शालेय व विद्यापीठात शिकत असलेल्या मुलांनी चालू शैक्षणिक वर्षात जी लक्षणीय कामगिरी केली,त्या बद्दल त्यांचा या प्रसंगी पाहुण्यांच्याहस्ते गुणगौरव करण्यात आला.
सर्पदंशावर देशात परिणामकारक लस संशोधन करणाऱ्या जगविख्यात औषध मंडळाची स्वातंत्र्यापूर्वी स्थापना झाली.शंभर वर्षे पूर्ण करणा-या हाफकिन जीव-औषध निर्माण मंडळाचा आर्थिक भार राज्यसरकार पहात आहे.परंतु कर्मचाऱ्यांच्या भविष्यकालीन योजनांवर मात्र सरकारचे दुर्लक्षीत धोरण राहिले आहे,त्यामुळे कामगार-कर्मचा-यांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि असंतोष पसरला आहे.कंपनीच्या भविष्याकालीन योजनांसाठी सरकारने १५० कोटी रुपये मंजूर कारावेत, या मागणीसाठी युनियन पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाद्वारे युनियनचे सल्लागार शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर लवकरच राज्याचे अन्न औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची भेट घेणार आहेत.
औषध निर्मितीत अग्रेसर असलेल्या या मंडळावर व्यवस्थापकीय संचालक मात्र गेल्या वर्षभरात सतत बदलत राहिल्याने,मंडळाच्या भविष्यकालीन योजनावर पाणी फेरले गेले आहे.त्या मूळे कर्मचा ऱ्यांच्या उज्वल भविष्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.यावर अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी कडाडून टीका केली आहे.यातून राज्य सरकारची अनास्था दिसून आली आहे,असेही गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे.कार्यक्रमाला सर्वश्री निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे,साई निकम आदी कामगारनेते उपस्थित होते.युनियनचे उपाध्यक्ष नितीन तिर्लोटकर, सरचिटणीस दीपक पेडणेकर,सहचिटणीस विवेक जाधव, सहचिटणीस विनया नार्वेकर आदी पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.अस्थापन अधिकारी श्रमिका पडियाल,लेबर वेल्फेअर अधिकारी अमित डोंगरे आदी व्यवस्थापनातील मान्यवरही या प्रसंगी उपस्थित होते..•••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा