शालेय जिल्हा सेपक टकारा स्पर्धा उद्घाटन.
परभणी:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा सेपक टकारा असोसिएशन वतीने
नूतन विद्यालय सेलू, येथे शालेय जिल्हा सेपक टकारा क्रीडा स्पर्धा नूतन विद्यालय सेलू दिनांक:-14/09/2024 रोजी 14/17/19/ मुले/मुली
गटात आयोजित करण्यात आल्या. स्पर्धा उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चिञपट दिग्दर्शक निशांत धापसे, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निशांत धापसे म्हणाले विद्यार्थीनी शालेय जीवनातून मिळाले शिदोरी भविष्यात निश्चित फळ देणारी आहे. शाळेत जीवनात क्रीडा स्पर्धेतील हार जीत पचवता आली पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे: राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, मुख्याध्यापक किरण देशपांडे,प्रा.नागेश कान्हेकर, जिल्हा सचिव गणेश माळवे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, यांनी केले.
स्पर्धेस पंच प्रमुख राजेश राठोड, संजय भुमकर, अनुराग आंमटी,विजय खंदारे, काकडे, यांनी काम पाहिले.
अंतीम निकाल
14 वर्षे मुले प्रथम: एल.के.आर.प्रिंन्स इंग्लिश सेलू, व्दितीय: नूतन विद्यालय सेलू.
14 मूली प्रथम: नूतन कन्या प्रशाला सेलू, व्दितीय: नूतन विद्यालय सेलू.
वर्ष गट - 17 मूले प्रथम : नूतन विद्यालय सेलू, व्दितीय: बिहाणी बाहेती नूतन विद्यालय सेलू, तृतीय: एल.के.आर प्रिन्स इंग्लिश सेलू,
वर्षे गट - 17 मुली
प्रथम: नूतन विद्यालय सेलू
द्वितीय:ल.ला.रा. नूतन कन्या प्रशाला सेलू ,
वर्षे गट - 19 मुले>प्रथम :नूतन महाविधालय सेलू , व्दितीय: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वि.जिंतूर ,
१९ वर्षे मुली: नूतन विधालय सेलू (प्रथम)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय जिंतूर (द्वितीय)
addComments
टिप्पणी पोस्ट करा