*नागोबाा चौकाचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव*

‌‌मुंबई ता. १६-(यश विकास सजगाणे)  पूर्व कुर्ला येथे नागोबा चौकाच्या महाराजाचा सोहळा पार पडला. याची स्थापना १९७५ साली झाली होती. यंदाचे वर्ष  सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले गेले. जवळपास दोन महिन्यांपूर्वी  येथील तरुण उत्साही  मुलांनी स्वतः मुर्ती बनवायला सुरुवात केली होती.तसेच सजावट देखील वीस दिवस आधी करण्यास सुरुवात केली होती. सजावट सुंदर आणि पर्यावरणपूरक होती. सगळ्यां चाळकऱ्यांनी  ४ फुटांच्या चाळीतून ८ फुटांचा गणपती बाप्पा आणला. मंडळातर्फे ढोलपथक, लेझीम पथक व झांज पथक आयोजित करण्यात आले होते.ढोल ताशांच्या गजरात  गणरायाची मिरवणूक काढण्यात आली होती.

टिप्पण्या