माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गोदावरी नदीच्या पुरामुळे नांदेड शहरातील नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

नांदेड प्रतिनिधी : मंगळवार दि. ३ सप्टेंबर २४मागच्या तीन-चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठेनुकसान झाले आहे, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी माजी मंत्री आमदारअमित विलासराव देशमुख यांनी आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह नांदेडशहरातील पाकीजा नगर, बिलाल नगर, लक्ष्मी नगर, गौतम नगर, खडकपुरा भागातजाऊन , गोदावरीचे पाणी वस्तीत घुसून  झालेल्या नुकसानीची पाहणी केली,अपतग्रस्तांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला, प्रशासनाने झालेल्यानुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना दिल्या. अपदग्रस्तांना  आवश्यक तीमदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला असे आश्वासन दिले.यावेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिर्झाफरदतुला बेग, नांदेड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार,  २१ शुगरचेव्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हा. चेअरमन समद

पटेल,  लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पवार, कंधार तालुका
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पंडागळे, राहुल हंबर्डे, विठ्ठल पावडे
दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, अण्णासाहेब पवार, सतीश देशमुख, पप्पू
कोंडेकर, तिरुपती कोंडेकर आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी
संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या