दिशाभूल करणा-या पूढा-यांपासून कामगारांनी सावध रहावे!*


   मुंबई दि.२३ : खटाव मिल कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगार संघर्ष समितीचे प्रविण घाग हे येत्या २ ऑक्टोबर गांधी जयंतीदिनी एन.एम. जोशी मार्गावरील,मफतलाल मिल‌च्या मेरॉथन टॉवरवर मोर्चा काढून कामगारांची दिशाभूल करीत आहेत,अशी सडेतोड टीका,खटाव मिल कामगारांचे संघटक सुनिल बोरकर,मारुती शिंत्रे यांनी केली आहे.     

   खटाव मिल कामगारांच्या घरांचा प्रश्न खरेतर‌ एमएमआरडीएने न्यायालयात दावा दाखल केल्यामुळे सुटणे कठीण होऊन बसला आहे.तेव्हा या केसेस त्यांनी त्वरितच काढून टाकाव्या,यासाठी एमएमआरडीएवर कामगारांचा मोर्चा नेणे आवश्यक आहे.केवळ मेरॉथान‌ विकासकावर सवंग लोकप्रियतेसाठी मोर्चा नेऊन प्रविण घाग कामगारांची शक्ती अकारण वाया घालवीत आहेत. गिरणी कामगार कृती संघटनेने‌ हा प्रश्न लावून धरला होता.परंतु प्रविण घाग यांनी गिरणी कामगार संघर्ष समितीसह ,गिरणी कामगार कृती संघटने पासून वेगळे होऊन, कामगारांच्या संघटीत शक्तीच फुट पाडली आहे. असल्या अवसान घातकी पुढा-या पासून आता कामगारांनी सावध राहिले पाहिजे,असाही सावधगिरीचा इशारा देऊन पत्रकात म्हटले आहे,गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दिवंगत कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनीच गिरणी उद्योगात काम करणाऱ्या पाच- सहा कामगार संघटनांना एकत्र आणून, कामगारांचा यशस्वी लढा उभा केला आणि गिरणी कामगारांना घरांचा हक्क प्राप्त करून दिला.परंतु प्रविण घाग केवळ स्वतःचे पुढाकारीपण वाढविण्यासाठी फुटिरतेचा डाव खेळले आहेत.खटाव मिलच्या कामगारांनी आपल्या हिताचा विचार करून असल्या पुढा-या पासून दोन हात दूर राहिले पाहिजे,असे सुनिल बोरकर, मारुती शिंत्रे यांनी शेवटी म्हटले आहे.••••

टिप्पण्या