राज्य शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत मुंबई, छ.संभाजीनगर, पुणे संघ विजयी


परभणी (.         )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा टेबल टेनिस असोशिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने

राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा २०२४-२५

उद्घाटन दि. २४ सप्टेंबर २०२४ 

स्पर्धेत १४ वर्षे मुलीच्या गटात छत्रपती संभाजीनगर, मुलाच्या गटात मुंबई, १७ वर्षे मुली गटात क्रीडा प्रबोधिनी तर मुलीच्या गटात मुंबई, १९ वर्षे मुलीच्या गटात मुंबई तर मुलांच्या गटात पुणे विभाग विजेता ठरला. 

बक्षीस वितरण सोहळास 

 प्रमुख पाहुणे म्हणून संजय कडू (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व राज्य कोषाध्यक्ष टे.टे.असो. )जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, लोंढे क्लासेस  संचालक अविनाश लोंढे,बाहेती सुगर स्पेशालिटी सेंटर डॉ पूजा बाहेती व डॉ महेश बाहेती डॉ.बाहेती , जिल्हा सचिव गणेश माळवे  ज्ञानेश्वर पंडित, सचिन पुरी,अजय कांबळे , ईश्वर कदम,शेख असद, अनिल बंदेल आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 


सदरील क्रीडा स्पर्धेत राज्यतील  ९ विभागतील ५४ संघाच्या ४३० खेळाडूंनी सहभागी झाले आहेत. यात क्रीडा प्रबोधिनी, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर विभाग सहभागी झाले आहेत.

         १४ वर्षे मुले गटात अंतिम फेरीत मुंबई वि. छ.संभाजीनगर  विभाग दरम्यान ३:0  लढतीत मुंबई विभाग प्रथम, छ.संभाजीनगर -व्दितीय तर अमरावती विभाग तृतीय ठरला. 

१४ वर्षे मुली गटात: अंतिम फेरीत  छ.संभाजीनगर वि. पुणे विभागात ३:१ सेट मध्ये छ.संभाजीनगर विभाग-प्रथम,पुणे विभाग-व्दितीय, तर मुंबई विभाग -तृतीय स्थान पटकावले. 


१७ वर्षे मुलाच्या गटात: अंतिम फेरीत मुंबई वि  पुणे दरम्यान अतितटी लढतीत ३:२ सेट मध्ये मुंबई: प्रथम, पुणे: व्दितीय , क्रीड प्रबोधिनी : तृतीय स्थान वर समाधान मानावे लागले फेरीत दाखल.

१७ वर्षे मुली गटात: अंतिम फेरीत कोल्हापूर  व क्रीडा प्रबोधिनी दरम्यान ३:० सरळ सेट मध्ये क्रीडा प्रबोधिनी: प्रथम, तर कोल्हापूर: व्दितीय,तर पुणे: तृतीय स्थान पटकावले. 

१९ वर्षे मुले गटात: अंतिम फेरीत पुणे वि मुंबई दरम्यान ३:१ सेट मध्ये पुणे: प्रथम , मुंबई: व्दितीय, छ.संभाजीनगर: तृतीय  स्थान पटकावले.

१९ वर्षे मुली गटात: अंतिम फेरीत  मुंबई वि पुणे विभाग दरम्यान ३:० सेट मध्ये मुंबई: प्रथम, पुणे: व्दितीय, तर नाशिक: तृतीय स्थान पटकावले.

पंच प्रमुख: मधुकर लोणारे (पुणे संतोष आचरेकर (पुणे)चिंतामणी इंगळे (पुणे)

साक्षी देवकते(परभणी) स्वप्नील आरसुल, सौरभ मस्के,शंतनू भुजबळ, हर्ष घाडगे कार्तिक उंडे,रुषिकेश खेडकर,ऋषिराज शर्मा (नागपूर)नामदेव खोलारे, हात निकाळजे,सुमीत कुलदीपके,शेख जिलानी,अजय कांबळे,प्रितवी खंडगळे,-

तांत्रिक समिती: विक्रम हत्तेकर,नरसिंह चाटे, उमेश देशमुख, हणमंत नरवाड, सूरज भुजबळ,तुषार जाधव,तुकाराम गायकवाड, शाहरुख एस.के,आयुष आठवले

 बनसोडे प्रसेनजीत. हे काम पाहत आहेत.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, रोहन औढेंकर, रमेश खुणे, प्रकाश पंडित, धिरज नाईकवाडे, योगेश आदामे आदी परीश्रम घेत आहेत.

टिप्पण्या