*मुंबई पोर्ट प्राधिकरणातून आंतरराष्ट्रीय महिला कामगार नेत्या कल्पना देसाई सेवानिवृत्त*


मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या लेखा विभागातील कार्यलयीन अधिक्षिका, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार,  मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर व हिंद मजदूर सभेच्या महिला कामगार नेत्या श्रीमती कल्पना देसाई या  ३१  ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई पोर्ट मधील ४० वर्षाच्या प्रदीर्घ निष्कलंक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या.  त्या निमित्ताने त्यांचा गोदी कामगार सहकाऱ्यांच्या वतीने ४ सप्टेंबर २०२४  रोजी मुंबई पोर्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सेवानिवृत्तीचा कार्यपूर्ती सत्कार सोहळा ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे माजी सचिव सी.एस. मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सत्कार सोहळ्यामध्ये मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष संजय भाटिया,  इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन राजीव जलोटा,  ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे माजी सचिव सी. एस. मूर्ती, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर यांनी कल्पना देसाई यांच्या कामगार चळवळ,  आंतरराष्ट्रीय कामगार चळवळ,  सामाजिक कार्य,  आंतरराष्ट्रीय,  राष्ट्रीय व राज्यस्तरीय मिळालेले पुरस्कार या कार्यावर  आधारित सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, सचिव जी. एस. राठोड,  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी विद्याधर राणे,  दत्ता खेसे,  मनीष पाटील,  मीर मिसार युनूस,  मारुती विश्वासराव,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी बबन मेटे, व्यंकटेश स्वामी,  महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष निवृत्ती धुमाळ,  खजिनदार विकास गुप्ते,  नुसीचे पदाधिकारी सलीम झगडे, मकसूद खान, अभिलाशा सोनवणे,  मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे  कार्याध्यक्ष सूर्यकांत शिंदे,  माजी कार्याध्यक्ष नंदू राणे,  मुंबई पोर्टच्या  सेवानिवृत्त अधिकारी श्रीमती पटवर्धन, मटेरियल मॅनेजर श्रीमती हजारनीस,  ट्राफिक मॅनेजर बी. एस. शिंदे, सिनियर असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर ए.एस. शेनगर,  शैलेश चव्हाण, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दिनेश पाटील, महाराष्ट्र इंटकचे नेते महेंद्र घरत, बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे,  फिलॉनथ्रोफिक फाउंडेशन ऑफ डॉक लेबर सुपरवायझरी स्टाफचे माजी अध्यक्ष प्रदीप गोलतकर, चिटणीस विजय सोमा सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सत्कार सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कल्पना देसाई यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन शिरीष हिंगणे यांनी केले. सत्कार सोहळ्याला मुंबई पोर्टचे अधिकारी, युनियनचे पदाधिकारी, गोदी कामगार, कल्पना देसाई यांचे कुटुंब,  मित्रमंडळी व विशेषता महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

आपला

मारुती विश्वासराव

 प्रसिद्धीप्रमुख 

 मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या