नांदेड दि.१७/९/२४
नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा नांदेड शहरातील विसावा गार्डन/मातागुजरीजी पार्क मधिल हुतात्मा स्मारकास आज रोजी आम आदमी पार्टीचे जिल्हा नांदेड च्या वतीने विनम्रपणे अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अँड जगजीवन भेदे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करताना म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नंतरही मराठवाडा भाग निझामाच्या सरंजामी शाहीत होता.आपला भु-भाग हा स्वतंत्र होऊन लोकांनीं लोकांसाठी चालवलेले राज्य हे आपले असले पाहिजे हे अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यांनी स्वप्न पाहीले या साठी आपल्या भागातील हुतात्मा पानसरे हा पहिला बलीदानी ठरला.परंतु शहिदांच्या स्वप्नाची राख रांगोळी ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर ते आजपर्यंत चालू आहे.विकासाचे राजकारण येथील राज्यकर्तेनी केलं नाही त्यामुळे मराठवाडा चा मुलभूत विकास खुंटला आहे.
परिणामी आजचे राजकारण हे मराठवाड्याच्या विकासासाठी सध्या चे राज्य केवळपोकळ घोषणांचीखैरात घोषणांचां पाऊस पाडतात.मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ईतिहास हा युवकांना प्रेरणादायी असतांना राज्य सरकारने अद्याप ही समावेश का केला नाही असा सवाल त्यांनी केला.यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंघ ग्रंथी, शहराध्यक्ष प्रा.देवीदासराव शिंदे सचिव डॉ अवधूत पवार बालाजी नागेश्वर संदीप इरलावार निळकंठ पाटील अँड रामदास शेरे बालाजी थोरात यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा