मुंबई १७:राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या विद्यमाने एन.एम.जोशी मार्गावर पोदार मिल येथे तसेच भायखळा येथील खटाव मिल येथे उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कक्षेत संघटनेचे अध्यक्ष (उध्दव बाळासाहेब ठाकरे)शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करून गणरायांना पुष्पहार अर्पण करून निरोप दिला.
दोन्ही स्वागत कक्षेवर भक्तगणांसाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती.खटावमिलच्या गेटवर लालबागच्या राजाचे भव्य स्वागत करण्यात आले.तेथे भक्तगणांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.लालबागचा राजा बंद खटाव मिल कामगारांचा जीवाभावाचे दैवत मानण्यात येत असल्याने कामगार प्रतिनिधीचा व्यवस्थेत मोठाच वाटा राहिला आहे.
संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने,
आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभात, खजिनदा र निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,मा.नगरसेवक सुनिल अहिर,शिवाजी काळे,बबन आसवले, मारुती शिंत्रे,महिदेव कोकीतकर,प्रकाश भोसले,नामदेव झेंडे,एम.पी.पाटील, सखाराम भणगे,मधू घाडी, विलास डांगे आदी पदाधिकाऱ्यांनी भाग घेऊन मोलाचा वाटा उचलला.****
addComments
टिप्पणी पोस्ट करा