मोहम्मद पैगंबर यांना अपेक्षित असलेली सहिष्णुतेची शिकवणच समस्त मानव कल्याणाची आहे पो. अधीक्षक अबिनाश कुमार


नांदेड: मोहम्मद पैगंबर यांना अपेक्षित असलेली सहिष्णुतेची शिकवणच समस्त मानव कल्याणाची आहे असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 

आज ईद मिलादुन्नबीच्या पूर्वसंध्येला शहरातील अनवर गार्डन फंक्शन हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात केले आहे.

 मुस्लिमेत्तर बांधवांना इस्लाम धर्माचे  शेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद सलल्लाहू अलैहि वसल्लम यांच्या शिकवणुकची व तत्त्वांची  ओळख व्हावी यासाठी येहसास फोरमच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला वक्ते म्हणून  नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, बौद्ध धर्माचे भंते  पय्याबोधी थेरो, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष  फारूक अहमद, यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाला लसाकमचे  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे जिल्हाध्यक्ष शिवा नारंगले, माजी जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले,  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


या वेळी फारूक अहमद यांनी पैगंबर मोहम्मद यांची  मानवता आणि बंधुभावावर आधारित शिकवणुकीची आपल्या भाषणात विस्तृत चर्चा केली. त्यांनी सांगितले की,  मोहम्मद पैगंबर यांनी शांतता, सहिष्णुता आणि सर्व मानवांच्या प्रति समानतेचा संदेश दिला, जो आजही अत्यंत महत्त्वाचा आहे.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या सामाजिक न्याय आणि सौहार्दाच्या शिकवणुकीवर व सिद्धांतावर भर दिला. मोहम्मद पैगंबर यांच्या संपूर्ण जीवन प्रवासातून आपल्याला आपसी बंधुभाव, शांतता आणि एकतेचा संदेश मिळतो. असे वक्तव्य केले. त्यानंतर 

भंते पय्याबोधी थेरो यांनीदेखील  मोहम्मद पैगंबर यांच्या विचारावर प्रकाश टाकताना सांगितले की, त्यांच्या सिद्धांतांचा उपयोग केवळ मुस्लिमांसाठीच नाही, तर संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायक आहे.

असाच फोरम या संघटने कडून आयोजित या कार्यक्रमाचा  उद्देश सर्व धर्मांमध्ये एकता आणि सद्भावना वाढवणे हा होता. या प्रसंगी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, ज्यांनी पैगंबर मोहम्मद यांचे जीवनप्रवास आणि त्यांनी दिलेल्या नीतीमूल्यांचे  महत्त्व विशद केले.

आपल्या भाषणात फार्म आले की, इस्लाम किंवा कुराणातील एखाद्या आयतचा अर्धवट वाक्य वापरुन जिहाद बद्यल गैरसमज पसरविण्याचे काम काही द्वेष्टे करत असतात परंतु मी जबाबदारीने सांगतो इस्लाम मध्ये जेहाद ही संकल्पना काफीरांच्या विरोधात नसुन जेहाद हे अत्याचार किंवा अन्याय करणा-यांच्या विरोधात असतो मग धर्माने स्वतःला मुसलमान म्हणत असतील व जनतेवर अन्याय करणार असतील  तर त्यांच्याही विरोधात लढण्याचे  इस्लाम देतो. जगात प्रसिध्द करबलाचे युध्द हे मुस्लिम राजवटीच्या विरोधातच होते ही लक्षात घेण्याची वेळ आली आहे.

म्हणुन मुस्लिमेत्तर समाजाची दिशाभुल करण्यासाठी मुस्लिम समाजा बाबत चुकीची माहीती प्रसारीत होते ती थांबवण्याची गरज आहे. असे सांगतानाच जिहाद हे अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याची वृत्ती आहे असेही फारुख अहमद आपल्या भाषणात म्हणाले. 

चुकीच्या व गैरसमज निर्माण करून देणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांची समाजात पेरणी होणे आवश्यक असून अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण देणाऱ्या, गोरगरीब, पीडित,  वंचित घटकांना न्याय देणारी मोहम्मद पैगंबर यांची शिकवण ही मानवी कल्याणासाठी असल्याचे भाष्य पुरुष अधीक्षक अविनाश कुमार यांनी आपल्या मनोगत केले.

टिप्पण्या