नांदेड:( दि.१० सप्टेंबर २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दुग्धशास्त्र विभागात डॉ.वर्गीस कुरियन यांच्या स्मृतीदिनानिमित्त 'दूध व मानवी आरोग्य' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच याप्रसंगी वृक्षारोपणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी भूषविले.
अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी, दूध हे पूर्ण अन्न असून दुध हे मानवी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे सांगितले.
यावेळी विभागप्रमुख डॉ. राजकुमार सोनवणे यांनी, डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
सूत्रसंचालन प्रा. लांडगे यांनी केले. याप्रसंगी विभागातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी आभार वैभव पावडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, आणि प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा