नांदेड:( दि.२३ ऑगस्ट २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील क्रीडा विभागाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पानसरे महाविद्यालय, अर्जापुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना एम.जी.एम. कॉलेज विरुद्ध यशवंत महाविद्यालय असा झाला. या स्पर्धेत यशवंत महाविद्यालयाने विजेतेपद प्राप्त केले.
संघातील खेळाडूंची नावे कु.पंजारे प्रणिता, कु.भोकरे करिष्मा, कु.जाधव वैदेही, कु.चिप्पेवार कविता व कु.शिंदे शरयु अशी आहेत तसेच मुलांच्या बॅडमिंटन स्पर्धा प्रकारामध्ये महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे, डोंगरीकर ऋतुराज, शिंदे शुभम, कोटुरवार तेजस,घोगरे ओम व राज राठोड.
या सर्व खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ. पैंजणे मनोज यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे व डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, प्रा.उत्तम केंद्रे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, प्रबंधक संदीप पाटील अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा