*नात्या-नात्यात पवित्र बंधन निर्माण करणारा‌ रक्षा बंधन!*

 

   मुंबई दि.१७: रक्षा बंधन केवळ बहिण भावाला राखी बांधते म्हणून सर्वत्र साजरा होत नाही तर एक दूस-या विषयी स्नेह,प्रेम आणि आपुलकीची शिकवण देणारा हा सण आहे,माणसा माणसातील वैर संपवून ख-या मानवतेची शिकवण देणारा हा दिवस आहे,असे विचार प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या अध्यात्म प्रचारक वंदना दिदी यांनी महिलांच्या मेळाव्यात बोलताना मांडले.

  राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महिला विभागाच्या वतीने 

परेलच्या मजदूर मंझील मधील जी.डी.आंबेकर कॅटरिंग कॉलेजच्या मिनी‌ सभागृहात महिला मेळावा पार पडला.प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने गेली तीस वर्षे हा प्रवच नाचा कार्यक्रम पार पडतो.विश्वविद्यालयाच्या प्रमुख प्रचारक वंदना दिदी मुंबईतील असंख्य संस्था आणि सामाजिक संस्थामध्ये जाऊन मानवतेच्या शाश्वत 

भावबंधा विषयी प्रवचन देत असतात.राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या राखी पौर्णिमे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात रक्षा बंधन करत असताना, संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदी पदाधि काऱ्यांना त्यांनी राख्या बांधल्या.

  महिलांपुढे बोलताना दिदी म्हणाल्या पुराणा पासून शिकवण मिळालेल्या या सणाद्वादे आजच्या कली (आधुनिक) युगात, माणसा-माणसात,समाज आणि राष्ट्रा-राष्ट्रात प्रम आपुलकी वाढताना ख-या मानवतेची शिकवण मिळते.श्रीराम,श्रीकृष्ण या दैवतांची थोरवी सांगताना दिदी यांनी आपल्या प्रवचनात आधुनिक काळाशी सांगड घालून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण,ममता घाडी, श्रावणी पवार आदींचे सहकार्य महत्वाचे ठरले••

टिप्पण्या