जेष्ठ नागरिक संघातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा*


नवी मुंबई सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, संघाचे अध्यक्ष मारुती कदम, सचिव राजाराम खैरनार, खजिनदार विष्णुदास मुखेकर, उपाध्यक्ष बळवंत पाटील, डॉ. विजया गोसावी, श्रीमती शहा, पाटील, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, गणेश कमळे, दत्तात्रय कुरळे, बौद्धउपासक भरत खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या