ज्येष्ठ कामगार नेते स्व. डॉ. शान्ति पटेल यांची जयंती साजरी.*

 मुंबई - अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांचे श्रद्धास्थान, स्वातंत्र्य सैनिक, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर, दूरदृष्टी नेतृत्व, ज्येष्ठ कामगार नेते स्व. डॉ. शान्ति पटेल यांची आज  ८ ऑगस्ट २०२४ रोजी माझगाव येथील कामगार सदन  कार्यालयात   युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये  व कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल  यांच्या हस्ते डॉ . शांती पटेल  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, संघटक चिटणीस मिर निसार युनूस, उपाध्यक्ष रमेश कुऱ्हाडे, शीला भगत, संघटक सचिव प्रवीण काळे, प्रसिध्दी प्रमुख मारुती विश्वासराव, कार्यालयीन सचिव रेखा गावडे उपस्थित होते. डॉ . शांति पटेल यांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सर्व पदाधिकारी, मॅनेजिंग कमिटी मेंबर्स, सभासद व तमाम बंदर व गोदी कामगारांतर्फे विनम्र अभिवादन.

टिप्पण्या