नांदेड - शहरातील अनेक नागरी समस्या घेऊन माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेतली. नागरी समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन आयुक्तांनी त्यांना दिले आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे व कट पॉइंट हे धोकादायक बनलेले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. मुख्य रस्त्यावरील बंद पडलेले स्ट्रीट लाईट व नवीन वसाहतीमध्ये पाहिजे असलेले नवीन स्ट्रीटलाईट याकडेही लक्ष वेधले. मुख्य रस्त्यावर अनेक झाडे धोकादायक स्थितीमध्ये लोंब कळत आहेत.त्यामुळे काही दिवसापूर्वी निष्पाप मुलाला आपला जीव गमावा लागला होता. गोदावरी नदीमध्ये ड्रेनेजचे पाणी येत असल्यामुळे व वाढलेल्या जलपर्णीमुळे गोदावरी प्रदूषित होत आहे. भव्य क्रीडा संकुल असून सुद्धा त्याचा वापर क्रीडा प्रेमींना करता येत नाही. सांस्कृतिक सभागृह असून त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करणे गरजेचे आहे अशा समस्या व्यक्त केल्या.
मनपा आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरून कट पॉईंट तात्काळ दुरुस्त केल्या जातील. धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. बंद पडलेल्या स्ट्रीटलाईट तात्काळ दुरुस्त केल्या जातील व नवीन स्ट्रीट लाईट साठी लवकरात लवकर टेंडर काढून नवीन स्ट्रीट लाईट बसविल्या जातील. गोदावरी नदीतील जलपर्णी काढून ड्रेनेजचे पाणी नदीमध्ये जाणार नाही क्रीडा संकुल व सांस्कृतिक सभागृहासाठी शासनाकडून निधीची व्यवस्था करून त्यांचे नुतनीकरण केल्या जाईल असा शब्द आयुक्तांनी दिला.
ह्या समस्या सोडवण्यासाठी जनतेचे सहकार्य मिळवून दिल्या जाईल असे भूमिका सतीश देशमुख यांनी मांडली. सतीश देशमुख यांनी 5 ऑगस्ट पासून सुरू केलेल्या नांदेड उत्तर परिवर्तन संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संघटनेच्या सहकार्यातून सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा