नांदेड:( दि.२१ऑगस्ट २०२४)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १)कॉमर्स असोसिएशन २)
मॅनेजमेंट असोसिएशन ३)टॅक्स असोसिएशन आणि ४)बँक असोसिएशन अशा विविध विद्यार्थी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर होते. उद्घाटक पीपल्स महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.डी.एस.यादव होते. अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले.
प्रारंभी प्रास्ताविक उपप्राचार्य, वाणिज विभागप्रमुख व विद्यापीठाचे विद्यापरिषद सदस्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी केले.
वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांना भविष्य घडवितांना अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेकडे एक संधी म्हणून बघितले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.डी.एस.यादव यांनी अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक वाणिज्य क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर आणि वाणिज्य क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांवर, उद्योजकतेच्या नव्या संधींवर आणि उद्योग क्षेत्रातील कौशल्यांच्या वाढत्या गरजांवर प्रकाश टाकला. त्यांच्या संवादाने विद्यार्थ्यांना वाणिज्याच्या क्षेत्रात उत्तम यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले प्रेरणा आणि उत्साह मिळाले
प्रमुख अतिथी डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी, वाणिज्य क्षेत्रात यश मिळविण्यासाठी तुम्हाला सतत शिकणे आणि नवीन गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे, आपल्या ध्येयाकडे लक्ष देणे आणि प्रत्येक दिवशी प्रगतीसाठी प्रयत्न करणे हेच यशाचे रहस्य आहे, असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांची उदाहरणे दिली आणि वाणिज्य क्षेत्रातील नाविन्ये आणि बदलांबाबत विचार मांडले.
याप्रसंगी कु.गायत्री खंदारे व कु. बलजिंदरकौर कांचवाले या दोन विद्यार्थिनींनी संपादित केलेल्या भित्तिपत्रकांचे पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य विकसित करावे, असा सल्ला दिला तसेच त्यांनी संघटनांच्या कार्याची महत्त्वाची माहिती दिली आणि यामधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधींचे वर्णन केले.
यावेळी वाणिज्य विभागाचे डॉ.आर.एल.सोनटक्के, डॉ.मोहम्मद आमेर, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा.सोनाली वाकोडे, प्रा.प्रियंका शिसोदिया यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन विद्यार्थी संघटनेचे पदाधीकारी किरपालसिंग तवाना व कु. अश्विनी नीलेवाड यांनी केले तर आभार अनिकेत बेंद्रे यांनी मानले.
कार्यक्रमास वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, चंद्रकांत मोरे, नाना शिंदे, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा