*संप टळला* *गोदी कामगारांच्या मागण्याबाबत दिल्लीत समझोता करार संपन्न*

भारतातील प्रमुख बंदरामधील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा समझोता वेतन करार इंडियन पोर्ट असोसिएशन व सहा मान्यताप्राप्त कामगार महासंघ यांच्यामध्ये मंगळवार, दि.२७  ऑगस्ट २०२४  रोजी दिल्लीमध्ये संपन्न झाला. त्यामुळे २८ ऑगस्ट पासून गोदी कामगारांचा होणारा बेमुदत संप टळला.

या समझोता वेतन करारानुसार 

१) ३१ डिसेंबर २०२१ च्या मूळ पगारात १ जानेवारी २०२२ चा ३०%  महागाई भत्ता विलीन करून त्यावर ८.५० टक्के फिटमेंट दिले जाईल.

२) घरभाडे भत्ता  ३० टक्के मिळेल.

३) नोकरीत असलेल्या कामगारांना प्रति महिना ५०० रुपये विशेष भत्ता मिळेल.

४) वेतन कराराचा कालावधी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पाच वर्षांचा असेल. 

५) वार्षिक पगारवाढ ३ टक्के मिळेल.

६) १ जानेवारी २०२२ पासून सध्याच्या प्रथेनुसार  प्रभावी वेतनश्रेणी तयार केल्या जातील.

७) द्विपक्षीय वेतन समितीमार्फत दहा दिवसाच्या कालावधीत सेटलमेंट तयार करण्यासाठी  मसुदा समिती स्थापन केली जाईल.या समितीमध्ये प्रत्येक फेडरेशनचा एक प्रतिनिधी असेल. समितीमध्ये आयपीएचे चेअरमन  व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी असतील.

८) द्विपक्षीय वेतन समितीमध्ये १५ दिवसाच्या आत वेतन कराराची कार्यवाही पूर्ण केली जाईल. 

महासंघाच्या नेत्यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री मा.श्री.सर्वानंद सोनोवाल, शिपिंग सचिव श्री. टी. के. रामचंद्रन,इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन श्री. राजीव जलोटा, व्यवस्थापकीय सचिव श्री.विकास नरवाल यांना धन्यवाद दिले.

दिल्लीत झालेल्या समझोता  वेतन करारावर  व्यवस्थापनाच्या वतीने इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटा व्यवस्थापकीय सचिव विकास नरवाल तर कामगारांच्या वतीने ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे (HMS) मोहम्मद हनीफ, केरसी पारेख,ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन (वर्कर्स) चे (HMS ),  सुधाकर अपराज,विद्याधर राणे, वॉटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे( CITU) नरेंद्र राव, इंडियन नॅशनल पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे (INTUC) मोहन अस्वानी, पोर्ट अँड डॉक वाटरफ्रंट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया (AITUC ) सर्वानंद,भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ( BMS) सुरेश पाटील यांच्या सह्या झाल्या आहेत.अशी माहिती  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांनी दिली. 

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या